महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू, अपघातग्रस्त मेन्टेंन्स व्हॅन रुळावरून हटवली - Ratnagiri Latest News

कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल साडेआठ तासानंतर सुरळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मेन्टेंन्स व्हॅनला झालेल्या अपघातामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. खवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ वावे गावाच्या परिसरात हा अपघात झाला होता. मेन्टेंन्स व्हॅनची मागील दोन चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर मेन्टेंन्स व्हॅन रुळावरून हटवल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

konkan-railway-resumes
कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू

By

Published : Dec 20, 2020, 5:40 PM IST

रत्नागिरी -कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल साडेआठ तासानंतर सुरळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मेन्टेंन्स व्हॅनला झालेल्या अपघातामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. खवटी रेल्वे स्टेशनच्या जवळ वावे गावाच्या परिसरात हा अपघात झाला होता. मेन्टेंन्स व्हॅनची मागील दोन चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर मेन्टेंन्स व्हॅन रुळावरून हटवल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

मार्ग सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

आज सकाळी मेन्टेंन्स व्हॅन खवटी खेडवरून रत्नागिरीकडे जात असताना ही घटना घडली होती. मेन्टेंन्स व्हॅनचा अपघात झाल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ही मेन्टेंन्स व्हॅन रुळावरून बाजूला करण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अखेर ही मेन्टेंन्स व्हॅन रुळावरून बाजूल करण्यात यश आल्याने, रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details