रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर आजपासून (शुक्रवार) 15 स्टेशन्सवर पीआरएस काउंटर सुरू करण्यात आले आहेत. देशभरात धावणाऱ्या 200 स्पेशल ट्रेन्ससाठी रिझर्व्हेशन या काउंटरवर उपलब्ध होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील पीआरएस काउंटर सुरू; देशभरातील रेल्वेचे बुकींग उपलब्ध - ratnagiri railway station
कोकण रेल्वे मार्गावर आजपासून (शुक्रवार) 15 स्टेशन्सवर पीआरएस काउंटर सुरू करण्यात आले आहेत. देशभरात धावणाऱ्या 200 स्पेशल ट्रेन्ससाठी रिझर्व्हेशन या काऊंटरवर उपलब्ध होणार आहे.
मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने सार्वजनिक परिवहन बंद झाले. यामुळे रेल्वेच्या देखील थांबल्या. फक्त मालगाडी आणि मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येत होत्या. लॉकडाऊनमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक देखील पूर्णतः बंद होती. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध शहरातील पी.आर.एस काउंटरही बंद होते. मात्र आजपासून विविध शहारातील पीआरएस काउंटर सुरू झाले आहेत. यामध्ये माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा, बेंदूर, या ठिकाणी असणाऱ्या रेल्वे काउंटरचा समावेश आहे. हे काउंटर सुरू झाल्याने तिकिटासाठी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी होती.