महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल - डब्बल डेक्कर

मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सेंट्रल रेल्वेने पुढील 24 तासात सर्व गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द

By

Published : Aug 4, 2019, 9:37 PM IST

रत्नागिरी- मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सेंट्रल रेल्वेने पुढील 24 तासात सर्व गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा कोकण रेल्वेवरही परिणाम झाला आहे. आता कोकण रेल्वेनेही आपल्या काही गाड्या रद्द केल्या आहेत.

कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द

कोकण रेल्वेने पावसामुळे अनेक गाड्या विविध स्थानकात थांबून ठेवल्या आहेत. तर त्यातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेकडो प्रवासी विविध स्थानकात अडकून पडले आहेत. जवळपास 12 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, नेत्रावती एकस्प्रेस, मत्सगंधा एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर, डबल डेकर, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांचे हाल -

भरपावसात कोकण रेल्वेच्या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना भरपावसात रेल्वे स्थानकावरच आसरा घ्यावा लागला आहे. उद्या पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गाड्या सुरु होण्याच्या आशेवर प्रवाशी रेल्वे स्थानकातच बसले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details