रत्नागिरी- कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून अनेक फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या 6 महिन्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकांकडून फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी 87 लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल - भरारी पथक
मागील 6 महिन्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकांकडून फुकट्या प्रवाशांना पकडून तब्बल 1 कोटी 87 लाखांचा दंड वसूल केला आहे.
कोकण रेल्वे
कोकण रेल्वे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, यामध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या देखील काही कमी नाही. गेल्या 6 महिन्यात कोकण रेल्वेच्या भरारी पथकाने फुकट प्रवास करणाऱ्या 33 हजार 840 फुकट्या प्रवाशांना पकडले. या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटी 87 लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना वचक बसला आहे.