रात्नागिरी- गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कालपासूनच (रविवार) कोलमडले होते. आजही गाड्या उशीरा धावत आहेत. बहुतांश रेल्वे उशीराने धावत असल्याने प्रवासी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. एक्सप्रेस गाड्या एक ते साडेतीन तास उशीरा धावत आहेत. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांतच ताटकळत बसावे लागत आहे.
ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रवाशांचे हाल - ratnagiri
गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कालपासूनच (रविवार) कोलमडले होते. आजही गाड्या उशीरा धावत आहेत. बहुतांश रेल्वे उशीराने धावत असल्याने प्रवासी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.
रेल्वे स्थानकातील गर्दी
यामध्ये, कोकणकन्या एक्सप्रेस २ तास २९ मिनिटे, तुतारी एक्सप्रेस २ तास ५ मिनिटे, पुणे-मडगाव ३ तास, सावंतवाडी गणपती विशेष २ तास ४४ मिनिटे, पनवेल सावंतवाडी गणपती विशेष ३ तास ५ मिनिटे, सीएसटी-सावंतवाडी गणपती विशेष १ तास तर कुर्ला-झाराप गणपती विशेष ४८ मिनिटे उशिरा धावत आहे.