रत्नागिरी घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी कोकणच्या गावी येतात. प्रत्येक गावामध्ये कुठे घुंगरांचा आवाज तर कुठे तबल्याची साद ऐकू येते. अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले डबलबारी celebrate Ganesh Festival 2022 तर काही ठिकाणी भजनांचा आवाज ऐकू येतो. Ganesh Chaturthi in Konkan 2022 अनेक ठिकाणी सार्वजनिक आरत्याही कानावर येतात. 2 वर्षाच्या कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहात कोकणात गणेशोत्सव साजरा होणार आहे. Ganeshotsav 2022 मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येवू लागले आहेत. कोकणात गणपती म्हटले की सर्वात मोठा सण या सणामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणाहून चाकरमानी मोठया संख्येने आपली हजेरी लावतात. Ganesh Utsav In Konkan सर्वात जास्त घरगुती गणपती हे कोकणामधील रत्नागिरी जिल्हयामध्ये दिसून येतात.
रत्नागिरी जिल्हयामध्ये १ लाख ६७ हजार ८४४ घरगुती गणपती तर १०९ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार आहे. Ganesh Chaturthi त्यामधील ११ हजार ९८४ दीड दिवसांचे गणपती आहेत. गौरी गणपतीपर्यंत १ लाख ३४ हजार १०३ घरगुती गणपती तर अनंत चतुर्दशीपर्यंत २१ हजार ७५७ घरगुती व १०९ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहेत. Konkan Ganesh Puja Committeeअनेक ठिकाणी गणपती सजावट स्पर्धा घेतल्या जातात, तर काही ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आदल्या दिवशी गणेशमूर्ती आणण्याची परंपरा कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हटला कि पंरपरा आणि वेगळेपणा आला. कोकणात अनेक ठिकाणी गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी गणरायाची मूर्ती घरी आणण्याची प्रथा आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात मूर्तीशाळेतून गणरायाला आपल्या डोक्यावरून आणलं जातं. पाट डोक्यावर ठेवून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली जाते. आणि ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत बाप्पाला घरी आणलं जातं.