रत्नागिरी - दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणी (murud Sai Resort case) भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) उद्या रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. (kirit somaiya in ratnagiri). किरिट सोमय्या यांचा फिर्यादी म्हणून पोलिस जबाब नोंदवणार आहेत. साडेअकरा वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात जातील, त्यानंतर दुपारी 12.30 वाजता ते पोलीस अधीक्षक कार्यालयात जातील. यावेळी पोलीस आपला जबाव नोंदवून घेणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
Kirit Somaiya : किरीट सोमय्या उद्या रत्नागिरीत, अनिल परब यांच्याविरोधात जबाब नोंदविणार - अनिल परब
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) मुरुड येथील वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणी (murud Sai Resort case) शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात जबाब नोंदविणार आहेत.
Kirit Somaiya
काय आहे प्रकरण? -दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरून दापोली पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. रिसाॅर्ट बांधकाम अपुर्ण असताना कर आकारणीची कार्यवाही केली आणि शासनाची फसवणुक केली म्हणून दापोली पोलिस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. त्यामुळे अनिल परब यांच्यासह मुरुडचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक अनंत कोळी यांच्यावर दापोली पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.