रत्नागिरी : वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांच्याबाबत रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांच्याकडे जवाब नोंदवल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशीनंतर अनिल परब कुठे असतील हे सांगता येत नाही असे सूचक विधान भाजपा नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी केले आहे.
Kirit Somaiya : चौकशीनंतर अनिल परब कुठे असतील, हे सांगता येत नाही; किरीट सोमय्या यांचे सूचक विधान - Kirit Somaiya has filed
भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्याबाबत जवाब नोंदविला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे. चौकशीनंतर अनिल परब कुठे असतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
![Kirit Somaiya : चौकशीनंतर अनिल परब कुठे असतील, हे सांगता येत नाही; किरीट सोमय्या यांचे सूचक विधान Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16900348-thumbnail-3x2-ksm.jpg)
किरीट सोमय्या यांचे सूचक विधान - यावेळी सोमय्या म्हणाले की, अनिल परब यांच्या साई रिसॉर्टसाठी सव्वा सहा कोटी रोख खर्च करण्यात आले. हा पैसा आला कुठून? हे कळेल. हा पैसा वाझेचा होता का की कुणा दुसऱ्याचा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी चौकशीनंतर अनिल परब कुठे असणार? हे कळेल असे सूचक विधान देखील केले.
किरीट सोमय्या यांनी जबाब नोंदविला - किरीट सोमय्या यांनी त्यांच्या जबाब नोंदविताना म्हटलंय की, अनिल परब यांनी नुसतीच फसवणूक केली नाही तर कोव्हिडच्या काळात 20 मार्च ते 20 ऑगस्ट दरम्यान त्यांनी अगदी लॉकडाऊन असताना देखील त्या रिसॉर्टचे गतीने काम केले. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. सोमय्या यांनी 62 पानांचे जबाबपत्र देऊन अनिल परब यांच्याविषयी पोलिसांना माहिती दिली आहे.