महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Khed Bell Agitation : ...अन्यथा खेड शहर भकास होईल, कौस्तुभ बुटाला यांचा आरोप - khed bell agitation

खेड शहराच्या विकासात खोडा घालण्यात येत आहे. त्याविरुद्ध कौस्तुभ बुटाला यांनी घंटानाद आंदोलन केलं. तसेच, सामान्य नागरिकांनी लक्ष द्यावे, अन्यथा खेड शहर भकास होईल, असा आरोपही त्यांनी ( Khed City Development Stopped ) केला.

Khed Bell Agiation
Khed Bell Agiation

By

Published : Feb 9, 2022, 8:28 AM IST

रत्नागिरी -कोणत्याही लोकपयोगी सुविधांना स्वत:च्या स्वार्थासाठी विरोध करुन राजकारण करत खेड शहराच्या विकासात खोडा घालणाऱ्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुटाला यांनी घंटानाद आंदोलन ( Khed Bell Agitation ) केलं. यावेळी त्यांनी प्रत्येक सामान्य नागरिकांनी शहराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा खेड शहर भकास होईल, असा गंभीर आरोप ( Kaustubh Butala Allegation ) केला. या आंदोलनाला खेड शहारातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.

त्यापुर्वी माध्यमांना संवाद साधताना कौस्तुभ बुटाला म्हणाले की, खेडवासियांसाठी आणलेल्या प्रत्येक सोयीसुविधा, विकास कामांना येथे सहकार्य मिळत नाही. मग ते सीएसआर निधीतून उपलब्ध केलेली दहा लाख किंमतीची दोन कंटेनराइज्ड अत्याधुनिक शौचालये, कोविड केअर सेंटर उभारणी, आयसीआयसीआय फाउंडेशने उभारलेली पीएसए टेक्नॉलॉजीवर आधारित ऑक्सिजन प्लांट आणि पाईपिंग सिस्टम सुरु करणे, खांब तळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामाची प्रगती, मीनाताई ठाकरे नाट्यगृहाची दुरावस्था, या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.

कौस्तुभ बुटाला घंटानाद आंदोलन

प्रशासन ढिम्म असून, राजकारणी केवळ मतांसाठी पुढे येतात. या अंतर्गत विरोधामुळे शहराच्या विकासाला खिळ बसत चालली आहे. हे सगळ गंभीर असून, प्रत्येक सामान्य नागरिकांनी शहराकडे लक्ष द्यावे लागेल. अन्यथा खेड शहर भकास होईल, असा आरोपही कौस्तुभ बुटाला यांनी केला.

हेही वाचा -Ajit Pawar On School : शनिवार, रविवार शाळा सुरु ठेवा, अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details