रत्नागिरी - सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीआघाडीने नविनचंद्र बांदिवडेकरांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांचे संबंध थेट सनातन संस्थेशी असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आरोपांचे खंडन केले असून याचा कोणताही परिणाम आघाडीच्या कार्यकर्त्यांवर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सनातनशी संबंधांवरून काँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर अडचणीत; आरोपांचे कार्यकर्त्यांकडून खंडण - congress
काँग्रेसकडून उमेदवार म्हणून घोषित झालेल्या बांदिवडेकर यांचा संबध थेट सनातनशी जोडला गेला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरही नेटिझन्सनी ट्रोल केले.याप्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेईल, असे म्हटले आहे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर सध्या अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसकडून उमेदवार म्हणून घोषित झालेल्या बांदिवडेकर यांचा संबध थेट सनातनशी जोडला गेला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरही नेटिझन्सनी ट्रोल केले. याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. याप्रकारानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट चौकशी करून पक्ष त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेईल, असे म्हटले आहे. मात्र, मतदारसंघातील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बांदिवडेकरांचा पाठराखण केले आहे.
बांदिवडेकरांचा संबंध सनातनशी जोडल्यानंतरदेखील कार्यकर्ते रत्नागिरी जिल्ह्यातील आजही त्यांचा प्रचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. उलट हे आरोप झाल्यानंतर आणखी जोरात प्रचाराला लागणार असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. नविनचंद्र बांदिवडेकर हे एक चांगले काम करणारे व्यक्ती आहेत. ते निष्कलंक चारित्र्याचे असून त्यांना उमेदवारी मिळाल्याने ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि त्यामुळेच विरोधकांनी ही खोटी आवई उठवल्याची प्रतिक्रिया भंडारी समाजाचे स्थानिक नेते आणि आघाडीचे कार्यकर्ते राजीव किर यांनी यावेळी दिली.