रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. आज अक्षयय्य तृतीयेचा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. मात्र, कोरोनाच्या लढाईसाठी सध्या रत्नागिरीतील सराफा बाजार पूर्णतः बंद आहे. त्यामुळे गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया अशा दोन्ही महत्वाच्या सणाला रत्नागिरीच्या सराफा बाजारपेठा पूर्णतः बंद असल्याचे चित्र होते.
अक्षय्य तृतीयेला गजबजणाऱ्या रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये पूर्णतः शांतता - अक्षय तृतीया रत्नागिरी
कोरोनाच्या लढाईसाठी सध्या रत्नागिरीतील सराफा बाजार पूर्णतः बंद आहे. त्यामुळे गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया अशा दोन्ही महत्वाच्या सणाला रत्नागिरीच्या सराफा बाजारपेठा पूर्णतः बंद असल्याचे चित्र होते.
![अक्षय्य तृतीयेला गजबजणाऱ्या रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये पूर्णतः शांतता jwellary shops and main markets are close on the occasion of ratnagiri amid corona virus](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6946344-181-6946344-1587884746546.jpg)
अक्षय्य तृतीयेच्या या मुहूर्तावर दिवसाला रत्नागिरी शहरात होणारी करोडोंची उलाढाल ठप्प झाली आहे. या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे बाजारपेठाच बंद आहेत, त्यात विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाईही होते. त्यामुळे लोक घराबाहेर पडतच नाहीत. एकूणच काही नियम मोडणाऱ्या लोकांचा अपवाद वगळता रत्नागिरीकरांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
दरम्यान रत्नागिरीच्या सराफा बाजारात आजच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...