महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुप्रसिद्ध चित्रकार रवींद्र मुळ्ये यांची चित्रे झळकणार जहांगीर आर्ट गॅलरीत, 4 जूनपासून प्रदर्शन सुरू - चित्र प्रदर्शन

श्री. मुळ्ये यांनी सुरवातीला टेंभ्ये हायस्कूलमध्ये 14 वर्षे आणि नंतर रा. गो. जागुष्टे  हायस्कूलमध्ये 15 वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून सेवा बजावली. नोकरीच्या काळात विद्यार्थ्यांना चित्रकलेचे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी छंदवर्ग, लँडस्केपसाठी वर्गदेखील आयोजित केले.

सुप्रसिद्ध चित्रकार रवींद्र मुळ्ये यांची चित्रे झळकणार जहांगीर आर्ट गॅलरीत

By

Published : Jun 3, 2019, 11:27 AM IST

रत्नागिरी - येथील सुप्रसिद्ध चित्रकार व निवृत्त चित्रकला शिक्षक रवींद्र विनायक मुळ्ये यांची 'वाईब्स ऑफ नेचर' या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण 28 चित्रे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झळकणार आहेत. 4 जून ते 10 जून 2019 या कालावधीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे.

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनाची त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. यासाठी त्यांनी 2011 ला अर्ज केला होता. 2 बाय 2 फूटापासून 4 बाय 3 फूटापर्यंतची चित्रे जहांगीरमध्ये पाहायला मिळणार आहेत. कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक रंगामध्ये साकारलेली ही चित्रे सर्वांनाच भुरळ घालणारी आहेत. मनातील स्पंदनांचे सृजन असलेली ही चित्रे पाहण्यासारखी आहेत.

श्री. मुळ्ये यांनी सुरवातीला टेंभ्ये हायस्कूलमध्ये 14 वर्षे आणि नंतर रा. गो. जागुष्टे हायस्कूलमध्ये 15 वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून सेवा बजावली. नोकरीच्या काळात विद्यार्थ्यांना चित्रकलेचे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी छंदवर्ग, लँडस्केपसाठी वर्गदेखील आयोजित केले. 2014 ला शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेसाठी वाहून घेतले आहे. पोर्ट्रेट, लँडस्केपमध्येही त्यांचा विशेष हातखंडा आहे. जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनाने त्यांच्या चित्रकारकिर्दीवर आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details