महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता खचला; पुलाचे बांधकाम निष्कृष्ठ

मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असून जोडरस्त्याला मोठ मोठे भगदाड पडले आहेत. पुलाच्या जोड रस्त्याला पडलेले खड्डे आणि खचलेला रस्ता यामुळे हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे.

जोडरस्त्याला मोठ मोठे भगदाड पडले आहेत

By

Published : Jun 29, 2019, 5:37 PM IST

Updated : Jun 29, 2019, 5:48 PM IST

रत्नागिरी -मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेला जगबुडी पूल वाहतुकीसाठी खुला होण्याच्या आधीच वादात सापडला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. विशेष म्हणजे जोडरस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याचे समोर आहे. तर पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील तडे गेलेत. विशेष म्हणजे या वर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता.

जोडरस्त्याला मोठ मोठे भगदाड पडले आहेत

मुंबई-गोवा महामार्गावर ब्रिटिशकालीन जगबुडी पूल होता. तो पूल कमकुवत झाल्याने त्याच्या शेजारी नवीन पूल बांधण्यात आला. पण नवीन पुलाची उद्घाटनाआधीच दैनावस्था झाली आहे. जगबुडी नदीवरील जुन्या पुलाची निर्मिती ब्रिटिशांनी १९३१ मध्ये केली. तब्बल ६ वर्ष पुलाच्या निर्मितेचे काम सुरू होते. १९३७ मध्ये हा जुना पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. ११८.२५ मीटर लांब असलेला हा पूल इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात तयार केलेला उत्तम व दर्जेदार बांधकामाचा नमुना आहे.

२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात नवीन पुलाच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर पर्यायी पुलासाठी ६ कोटी ४ लाख ३५ हजार ९९३ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. १० एप्रिल २०१५ रोजी नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नविन पूल खुला होण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी बांधकामाचा आढावा घेतला. तसेच पुलावरून आपली कार नेत ट्रायल देखील घेतली होती. त्यानंतर पूल वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकाऱयांनी त्यावेळी दिला. मात्र पहिल्याच पावसात या पुलाची पुरती वाट लागली आहे. पुलाच्या जोड रस्त्याला पडलेले खड्डे आणि खचलेला रस्ता यामुळे हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे.

Last Updated : Jun 29, 2019, 5:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details