महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 3, 2019, 5:25 PM IST

ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडीचा पूल वाहतुकीस बंद

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरीत पावसाचा कहर

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरीही उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे. खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सुरक्षतेच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडीचा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रत्नागिरीत पावसाचा कहर

मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड दापोली रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. तर गोळवली करजुवे रस्त्यावरही दरड कोसळली.

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोली, मंडणगड, खेड आणि लांजा तालुक्यांमध्ये पडला आहे. या तालुक्यांमध्ये तब्बल १५० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात पडला असून येथे तब्बल १७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली तालुक्यातही १७० मिलिमीटर, लांजा तालुक्यात १६८ मिलिमीटर, तर खेड तालुक्यात १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात १४४ मिलिमीटर, तर राजापूर तालुक्यात ११८ मिलिमीटर आणि चिपळूणमध्ये ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details