रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर खेडमध्ये असणाऱ्या जगबुडी पुलशेजारी नवीन पूल बांधण्यात आला आहे. मात्र या नवीन पुलाच्या जोडरस्त्याला मोठे भगदाड पडले असून ठिकठिकाणी हा जोडरस्ता खचला आहे. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निकृष्ट कामाला महामार्गाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. आणि चक्क अधिकाऱ्यांनाच पुलाला बांधण्यात आले. सध्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
VIDEO : मनसैनिकांनी 'त्या' अधिकऱ्यांना बांधले जगबुडी नदीच्या पुलाला - पुलाच्या जोडरस्त्याला
कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे या निकृष्ट कामाला अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या निकृष्ट कामाला महामार्गाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करित मनसेकडून चक्क अधिकाऱ्यांनाच पुलाला बांधण्यात आले.
कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या जगबुडी नदीवरील नवीन पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. या ठिकाणी पुलाच्या संरक्षक भिंतीलाही तडे गेले आहेत. यावर्षी वाहतुकीसाठी पूल खुला होणार होता. मात्र जोडरस्त्याला भगदाडे पडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत या खड्डांमध्ये झाडे लावण्याचे आंदोलनही केले. दरम्यान या निकृष्ट कामाला अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
मनसेचे वैभव खेडेकर आणि कार्यकर्त्यांनी याबाबत आक्रमक होत पुलावरच अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांना या पुलावरच दोरीने बांधले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान पोलिसांनी यात मध्यस्थी करत या अधिकाऱ्यांना सोडवले. त्यामुळे सध्या या व्हिडिओची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगत आहे.