महाराष्ट्र

maharashtra

शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आता 'नो आयटम साँग'

By

Published : Jan 30, 2020, 7:02 PM IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आयटम साँगवर डान्स करता येणार नाही. अशा कार्यक्रमांमध्ये आयटम साँगवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रोहन बने यांनी घेतला आहे.

Item song has been banned in Zilla Parishad schools
रत्नागिरीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता आयटम सॉंगवर बंदी

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयटम साँगवर डान्स करता येणार नाही. अशा कार्यक्रमांमध्ये आयटम साँगवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन बनेंनी घेतला आहे. जिल्ह्यातल्या 2500 शाळांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे.

रत्नागिरीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता आयटम सॉंगवर बंदी

हेही वाचा -भाजप दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी अ‌ॅड. दीपक पटवर्धन यांची निवड

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जवळपास 40 हजार विद्यार्थी सध्या शिकत आहेत. तर, 7 हजार शिक्षक काम करत आहेत. दोन दिवसांपूर्वी देवरूखमधल्या कोसुंब या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहिले, मात्र असे नाच सादर करून मुले कुठेतरी वायफळ मार्गाला जाऊ नयेत, त्यामुळे आज आपण बोललो नाही तर नंतर या पिढीला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे ते संस्कार करण्याची जबाबदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.

हेही वाचा -रत्नागिरीत दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेत पर्यटन वाढीसाठी विचारविनिमय

ABOUT THE AUTHOR

...view details