रत्नागिरी -पाटबंधारे विभाकडून जिल्ह्यातील 30 धरणांवर 24 तास करडी नजर ठेवली जात आहे. रिक्त पदांमुळे नियमित कर्मचारी नेमणे शक्य नसल्याने कंत्राटी पध्दतीने सुमारे तीस जणांची पाच महिन्यांसाठी नियुक्ती केली आहे. अतिवृष्टीमध्ये धरणे ओव्हरफ्लो होतात आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांना धोका निर्माण होतो. त्यासाठी 30 धरणांवर नजर ठेवली जात आहे.
तिवरे धरण फुटी दुर्घटनेमुळे पाटबंधारे विभाग सतर्क..
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटी दुर्घटनेमुळे पाटबंधारे विभाग अधिक सजग झाले आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी पाटबंधारे विभागातर्फे पावसाळ्यात विशेष नियोजन केले जाते. यंदा मे महिन्याच्या मध्यात आलेले तौक्ते वादळ आणि जुनच्या पहिल्याच आठवड्यात अति मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पाटबंधारे विभाग आधीच सतर्क झाला होता. जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही सुरू केली होती. धरणातून विसर्ग होणार्या बाजूला नदी किनारी असलेल्या लोकांना सतर्कत करण्यासाठी सोशल मिडीयासह ग्रामपंचायतींशी संपर्क ठेवण्यात येत आहे.