महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

shivsena MP Vinayak Raut :पंतप्रधानांचा ताफा ज्या ठिकाणी थांबला त्या संपूर्ण घटनेची त्रयस्थपणे सखोल चौकशी करा - खा. राऊत

पंतप्रधानांचा ताफा ज्या प्रकारे ज्या ठिकाणी थांबला ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. देशाच्या पंतप्रधानांचा ताफा (Prime Minister's convoy stopped in Panjab) अशा पद्धतीने थांबवण्याची प्रथमच अशी घटना घडलेली आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी त्रयस्थपणे होण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया संसदेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.

shivsena mp Raut
shivsena mp Raut

By

Published : Jan 7, 2022, 3:07 PM IST

Updated : Jan 7, 2022, 3:19 PM IST

रत्नागिरी -पंतप्रधानांचा ताफा ज्या प्रकारे ज्या ठिकाणी थांबला ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. देशाच्या पंतप्रधानांचा ताफा अशा पद्धतीने थांबवण्याची (Prime Minister's convoy stopped in Panjab) प्रथमच अशी घटना घडलेली आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी त्रयस्थपणे होण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया संसदेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

दरम्यान राज्य सरकारला दोष देऊन, किंबहुना पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेला दोष देऊन, जमणार नाही. भविष्यात पंतप्रधानांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबाबत असं होता कामा नये, असं आपलं मत आहे. दरम्यान कोणत्या गोष्टीचं पक्षीयकरण कसं करायचं हे भाजपाकडून शिकण्यासारखं आहे, असा टोला देखील त्यांनी यावेळी भाजपाला लगावला.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

हे ही वाचा -PM Security Breach : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत घोडचूक; तीन सदस्यीय समिती पोहचली घटनास्थळी

भाजपने अशा लोकांना पक्षातून हाकलून दिलं पाहिजे - राऊत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी केलं आहे. यावरून खा. विनायक राऊत यांनी भाजपला सुनावले आहे, अत्यंत निर्लज्जपणाचा हा कळस आहे, अशा मनोविकृतीची माणसं भाजपमध्ये महत्वाच्या पदांवर काम करत असतील तर त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. ही आपली भारतीय संस्कृती नाही, त्यामुळे भाजपने सुद्धा अशा लोकांना पक्षातून हाकलून दिलं पाहिजे अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला सुनावले आहे.

Last Updated : Jan 7, 2022, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details