रत्नागिरी- दापोली विधानसभा मतदारसंघ हा नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र, 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या सूर्यकांत दळवी यांचा त्यांनी पराभव केला होता. शिवसेना नेते रामदास कदम यांच्यामुळे आपला पराभव झाल्याचं दळवी नेहमी सांगतात. त्यानंतर दळवी आणि रामदास कदम यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे.
आमदार संजय कदम आणि सूर्यकांत दळवींना जनताच उत्तर देईल- योगेश कदम - दापोली विधानसभा मतदारसंघ
या निवडणुकीत रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेनेकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सूर्यकांत दळवी योगेश कदम यांच्याविरोधात काम करणार एवढे नक्की आहे. दळवी यांनी कितीही विरोध केला तरी इथला शिवसैनिक त्यांचे ऐकणार नाही. जनताच या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल, असे योगेश कदम यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेनेकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सूर्यकांत दळवी योगेश कदम यांच्याविरोधात काम करणार एवढे नक्की आहे. दळवी यांनी कितीही विरोध केला तरी इथला शिवसैनिक त्यांचे ऐकणार नाही. जनताच या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल, असे योगेश कदम यांनी म्हटले आहे. आमदार संजय कदम हे चुकून निवडून आलेले आहेत. दळवींवर नाराजी होती त्यामुळे लोकांना बदल हवा होता, त्यांनी तो बदल करून पाहिला. पण जनतेचा त्यांनी अपेक्षाभंग केला आहे. जनतेला विकास हवा आहे, त्यामुळे जनताच या निवडणुकीत कदम यांना उत्तर देईल, असे योगेश कदम यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले आहे.
योगेश कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.