महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळात भरकटलेले 'ते' जहाज इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन बाहेर काढणार

निसर्ग चक्रीवादळात भरकटलेले बसरा स्टार जहाज गेल्या तीन महिन्यांपासून मिऱ्या किनाऱ्याजवळ अडकून पडले आहे. ते जहाज बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनमार्फत हे जहाज बाहेर काढण्यात येणार आहे.

basara star ship
बसरा स्टार जहाज

By

Published : Sep 3, 2020, 3:19 PM IST

रत्नागिरी -निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात 'बसरा स्टार' जहाज सापडून ते भरकटले आणि रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्याला लागले. गेल्या 3 महिन्यांपासून जहाज त्या ठिकाणी असून ते काढण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. जहाजाचा सर्व्हे करून ते समुद्रातून बाहेर काढण्यात येणार आहे. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

चक्रीवादळाचा तडाखा बसलेले बसरा स्टार जहाज

सध्या समुद्र शांत आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण करून 'इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेश'नकडून लवकरच हे जहाज काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी दिली आहे. दरम्यान, ऑर्गनायझेशनची टीम कधीही सर्व्हेसाठी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-'रिफायनरी विषय संपला, आता कोणीही तो उकरुन काढू शकत नाही'

मिऱ्या समुद्रकिनारी अडकलेल्या बसरा स्टार जहाजाला तीन महिने पूर्ण झालेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये पावसाळ्यातील अनेक हायटाईड भरतीच्या लाटांचा तडाखा या जहाजाने सोसला आहे. त्यामुळे पाण्यावर तरंगणारे हे जहाज बंधाऱ्यावर आदळून खालून फुटले, काही ठिकाणी चेपले गेले. केबिनच्या बाजूने जहाज फुटल्याने पाणी जाऊन ते किनाऱ्यावर वाळूमध्ये रुतले आहे. जहाज वाचवण्याच्या दृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे.

भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साह्याने जहाजावरील जळके ऑइल काढण्यात आले. सात हजार लिटर ऑइल बॅरलमध्ये काढण्यात आले आहे. त्यानंतर लगोलग जहाजामधील 25 हजार लिटर डिझेल काढण्यात आले. जहाजावरील इंधन रिकामे केल्यानंतर समुद्र किनारा सुरक्षित ठेवण्यास प्रादेशिक बंदर विभागाला यश आले. मात्र, आता जहाज काढण्याची जटील समस्या बंदर विभाग आणि जहाज एजन्सीपुढे आहे.

दुबई येथील बसरा स्टार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मेरीटाईम बोर्डाशी चर्चा करून जहाज काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोणत्याही खासगी एजन्सीला हे काम न देता इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनला हे काम देण्यात आले आहे. ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे जहाज काढण्यात येणार आहे. सर्व्हे करून लवकरच ऑर्गनायझेशनकडून जहाज काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details