महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यातील 63 धरणांपैकी 51 धरणे 100 टक्के भरली

कोकणात दरवर्षी पेक्षा यावर्षी अधीक दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 63 धरणांपैकी एकूण 51 धरणे 100 टक्के भरली आहेत. तर 4 धरणे 90 टक्क्या पेक्षा जास्त भरली आहेत.

शीळ धरण

By

Published : Aug 12, 2019, 5:08 PM IST

रत्नागिरी -गेल्या महिनाभरात धरण क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणात चांगलाच पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 63 धरणांपैकी 51 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणामध्ये झालेला पाणीसाठा पाहून जिल्हावासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

शीळ धरण
कोकणात दरवर्षी पेक्षा यावर्षी अधीक दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 51 धरणे 100 टक्के भरली आहेत. तर 4 धरणे 90 टक्क्या पेक्षा जास्त भरली आहेत. जिल्ह्यात एकूण 60 लघुपाटबंधारे प्रकल्प आणि 3 मध्यम प्रकल्प आहेत. या सर्वच 63 धरणांमध्ये एकूण 469.72 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. तर उपयुक्त पाणीसाठा 394.22 दशलक्ष घनमीटर एवढा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात नातूवाडी, राजापूर तालुक्यात अर्जुना आणि संगमेश्वर तालुक्यात गडनदी असे तीन मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. यांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 182.69 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. तर आतापर्यंत एकूण 161.28 दशलक्षघनमीटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. पैकी राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे.


100 टक्के भरलेले प्रकल्प -

मंडणगड - पणदेरी, चिंचाळी, तुळशी
दापोली - सोंडेघर, सुकोंडी, टांगर, पंचनदी, आवाशी
खेड - शिरवली, शेलडी, कोंडीवली, कुरवळ
चिपळूण - फणसवाडी, मालघर, कळंवडे, अडरे, मोरवणे, आंबतखोल, खोपड, असुर्डे, राजेवाडी
गुहागर - गुहागर, पिंपर
संगमेश्वर - तेलेवाडी, कडवई, मोर्डे, नवी, रांगव
रत्नागिरी - शीळ
लांजा - शिपोशी, व्हेळ, गवाणे, बेणी, झापडे, केेळंंबा, मुचकुंदी, पन्हाळे, हर्दखळे, इंदवटी, कुवा
राजापूर - अर्जुना(मध्यम प्रकल्प), तळवडे, दिवाळवाडी, बारेवाडी, ओझर, चिंचवाडी, कोंडये, काकेवाडी, गोपाळवाडी, जुवाठी, वाटूळ.

ABOUT THE AUTHOR

...view details