महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uday Samant On Shashikant Warishe : पत्रकार वारीशे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या गुन्हेगाराला सोडणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत - Journalist Shashikant Warishe

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

Uday Samant On  Shashikant Warishe
Uday Samant On Shashikant Warishe

By

Published : Feb 9, 2023, 11:06 PM IST

उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी :पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, असेही उदय सामंत म्हणाले.

302 अन्वये गुन्हा दाखल : यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, पालकमंत्री म्हणून मी स्वतः या संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे. ज्याच्या गाडीने हा प्रकार घडला होता. त्याच्यावर सुरुवातीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. खोलात तपास झाल्यानंतर असे लक्षात आले की हे जाणीवपूर्वक झालेले आहे. त्यामुळे नंतर 302 चे कलम देखील लावण्यात आलेले आहे.

सखोल चौकशी करणार : महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्ग देखील कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. डिवायएसपी किंवा होम डिवायएसी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास केला जाईल. घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

कलम 302 लावण्याची मागणी : अपघातास कारणीभूत ठरलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरुध्द भादवी कलम 302 लावण्यात यावे अशी मागणी वाढत होती. त्यानंतर राजापूर पोलिसांनी आंबेरकर यांच्यावर भादवी कलम 302 ची नोंद केली. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, फिर्यादीच्या पुरवणी जबाबानुसार 302 कलम लावण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. अधिक पुरावे जमा करण्यात येत आहेत. साक्षीदारांची माहिती घेतली जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याचे काम सुरू आहे. बाकी तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

अपघात की घातापात? पत्रकार शशिकांत वारिशे यांची राजापूर पेट्रोल पंपावर 'थार' गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघाती मृत्यू नसून घातपात आहे, असा आरोप पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांनी केली होती.

अहवाल न्यायालयाला सादर : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अटकेत असलेला महिंद्रा थारचा चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादवी कलम 302 लावण्यात आले आहे. फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबावरून हे कलम वाढविण्यात आले असून तसा अहवाल माननीय कोर्टला सादर केला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

वारीशे दुचाकीला अपघात : अपघात राजापूर कोदवली येथील पेट्रोलपंपाजवळ सोमवारी दुपारी थार गाडी आणि वारीशे यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले होते.

सात दिवसांची पोलीस कोठडी :त्या अपघातानंतर मृत्युमुखी पडलेले पत्रकार शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलासात दाखल केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलिसानी थार गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्यावर भादवि कलम 308 , तसेच सदोष मनुष्यवधाचे कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

हेही वाचा -Aaditya Thackeray Pradnya Satav Attack : प्रज्ञा सातव, आदित्य ठाकरेंवर हल्ला; हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details