महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लांजा शहरात संविधानाची प्रतिमा साकारून साजरा केला दीपोत्सव

लांजा शहरात १४,४४४ पणत्यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची प्रतिमा साकारत अनोखा दिपोत्सव साजरा करण्यात आला.

लांजा शहरात अनोखा दिपोत्सव साजरा

By

Published : Oct 28, 2019, 1:12 PM IST

रत्नागिरी -जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी दिपावलीचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचंही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लांजा शहरात १४ हजारांवर पणत्यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची प्रतिमा साकारत अनोखा दिपोत्सव साजरा करण्यात आला.

लांजा शहरात अनोखा दिपोत्सव साजरा

लांजा शहरातील फ्रेंडस् ग्रुप लांजाच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या स्वरूपातील दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमात लांजा न्यु इंग्लिश स्कुलच्या पटांगणावर १४ हजार ४४४ पणत्या लावण्यात आल्या. तसेच या पणत्यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची प्रतिमा साकारण्यात आली. फ्रेंडस् ग्रुपच्या माध्यामातून अशा पद्धतीने दिपोत्सव साजरे करण्याचे हे १४ वे वर्ष आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या दिपोत्सव आयोजनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details