रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात घट झालेली असताना, आता पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात ४०१ नवे रुग्ण आढळले आहेत, तर मागील २३४ असे एकूण ६३५ नवे रुग्ण जिल्हा रुग्णालयाने बुधवारी जाहिर केले. तर दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत ३४ हजार १८९ पॉझिटिव्ह रुग्ण
बुधवारी २ हजार ४२४ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये ४०१ पॉझिटिव्ह तर २०२३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ६० हजार ९२६ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, दरम्यान आतापर्यंत ३४ हजार १८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २९ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ३४२० रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत.
आज रुग्णांचा 21 मृत्यू