पेण -राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे ( National Science Day ) औचित्य साधून पेण बोरगाव येथील कोनायसन्स स्कुल ( Convenience School Pen ) येथे जेष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने यांच्या हस्ते सायन्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले. 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून पेण येथील कोनायसन्स स्कुल येथे सोबती संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी बापूसाहेब नेने यांच्या हस्ते सायन्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले.