महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची सराफा दुकानांकडे पाठ - Gold buying Ratnagiri

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सराफा दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी असते. मात्र, यावर्षी ग्राहकांनी सराफा दुकानांकडे पाठ फिरवली आहे. आज एक तोळे सोन्याचा दर ५१ हजाराच्या घरात आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे.

ग्राहकांची सराफा दुकानांकडे पाठ
ग्राहकांची सराफा दुकानांकडे पाठ

By

Published : Oct 25, 2020, 7:09 PM IST

रत्नागिरी - दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी करण्याचा मुहूर्त अनेक जण साधतात. मात्र, यावर्षी बाजारपेठेत ओस पडली आहे. सोन्याचे वाढलेले दर आणि त्यातच कोरोनामुळे नागरिकांचे रोजगार हिरावले, त्यामुळे अनेकांना सोने परवडेनासे झाले आहे.

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सराफा दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी असते. मात्र, यावर्षी ग्राहकांनी सराफा दुकानांकडे पाठ फिरवली आहे. आज एक तोळे सोन्याचा दर ५१ हजाराच्या घरात आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे, नागरिकांच्या हाती पैसा नाही. त्यामुळे, त्यांनी सोने घ्यायचे टाळले आहे. सोने विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले.

हेही वाचा-महाआघाडीत बिघाडी? शिवसेना आमदाराचा खासदार तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

ABOUT THE AUTHOR

...view details