रत्नागिरी -वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखी कडक लाॅकडाऊन होण्याची शक्यता आहे. यात जिल्हा बंदीची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा बंदीचा निर्णय आज होवू शकतो. मात्र असं असलं तरी कोकणाची लाईफलाईन असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सध्या वाहनांची वर्दळ खूपच कमी आहे.
कडक निर्बंधाचा वाहतुकीवर परिणाम, मुंबई-गोवा महामार्गावर तुरळक वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी
सध्या कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी अजिबात पाहायला मिळत नाहीये. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहानेच मुंबई- गोवा महामार्गावर धावताना दिसत आहेत. अवजड वहाने आणि काही तुरळक वाहतूक मुंबई गोवा महामार्गावर आहे. मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे, अशा वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हातखांबा याठीकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. अत्यावश्यक कारणासाठीच वाहनातून प्रवास होतो आहे का? सोबत कागदपत्रे आहेत की नाही? अशा सर्व गोष्टींची तपासणी पोलीस करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घातलेल्या कडक निर्बंधांचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, महामार्गावर शुकशुकाट दिसून येत आहे. याचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
हेही वाचा -"ही शेवटची सकाळ असेल...", क्षय रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. मनीषा जाधव यांचे कोरोनामुळे निधन