महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपघातात दुचाकीवरील अवैध दारुच्या बाटल्या पडल्या.. तस्करांचा रिक्षाचालकाला मारहाण करत पुलावरून फेकण्याचा प्रयत्न

भाटे चेक-पोस्टपासून हाकेच्या अंतरावर हा सारा प्रकार घडला. हॉकी स्टिकने मारहाण होत असताना भाटे चेक-पोस्टमधील पोलीस कर्मचारी काय करत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तस्करांचा रिक्षाचालकाला मारहाण करत पुलावरून फेकण्याचा प्रयत्न

By

Published : May 19, 2019, 12:10 AM IST

रत्नागिरी - शहरानजीकच्या भाटे पुलावर रिक्षा व दुचाकी यांच्यात अपघात झाला. अपघातानंतर रिक्षाचालकाला ४ जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिकने बेदम मारहाण करून रिक्षाचालकाला पुलावरून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहींनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघातानंतर दुचाकीमधून दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्याने दारूची वाहतूक उघडकीस आल्यामुळे रिक्षाचालकाला मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.

घाटी येथून प्रवासी घेऊन निघालेल्या परेश अशोक शिवलकर (वय ४५, राहणार म्हामुर वाडी, मजगाव) यांची रिक्षा भाटे पुलावर आली असता समोरून एक्सेस दुचाकी घेऊन आलेला स्वार मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता. त्यावेळी रिक्षा व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

तस्करांचा रिक्षाचालकाला मारहाण करत पुलावरून फेकण्याचा प्रयत्न
या अपघातानंतर दुचाकीतून दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या. त्यावेळी रिक्षाचालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. याचा राग येऊन दुचाकीस्वाराने आपल्या मोबाईलवरुन फोन करून काही तरुणांना बोलून घेतले. अवघ्या काही क्षणातच ४ तरुण हातात हॉकी स्टिक घेऊन भाटे पुलावर दाखल झाले. संतप्त झालेल्या तरुणांनी विचार न करता सुरुवातीला रिक्षाची तोडफोड केली आणि त्यानंतर रिक्षाचालक परेश शिवलकर यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली.

दिवसाढवळ्या भाटे ब्रिजवर घडलेला अमानुष मारहाणीच्या प्रकारानंतर त्या तरुणांनी रिक्षाचालक परेश शिरोडकर यांना पुलावरून पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार पाहून पुढे झालेल्या नागरिकांमुळे परेश यांचे प्राण वाचले. यादरम्यान परेश यांचा मेहुना टेम्पो घेऊन त्या मार्गावरून निघाला होता. परेशला मारहाण होत असल्याचे पाहून तो मदतीसाठी पुढे धावला. मारहाणीत दुखापत झालेल्या परेशला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याचे हात व पाय लुळे पडल्याने त्याला पुढील उपचाराकरिता हाय सेंटरला हलवण्याचा सल्ला देखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.

भाटे चेक-पोस्टपासून हाकेच्या अंतरावर हा सारा प्रकार घडला. हॉकी स्टिकने मारहाण होत असताना भाटे चेक-पोस्टमधील पोलीस कर्मचारी काय करत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच या मार्गावरून दररोज अवैध दारूची वाहतूक होत असते. त्यामुळे या चेक पोस्ट मधील कर्मचारी नेमके कोणत्या वाहनाची चेकिंग करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जखमी झालेले परेश शिवलकर हे सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, रिक्षाचालकाला झालेल्या मारहाणीप्रकरणी रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायीक संघटनेचे अध्यक्ष प्रताप भटकर यांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली असून मरण करणाऱ्यांना अटक झाली नाही तर रिक्षा व्यावसायिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details