महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसोबत सेटिंग केलं असं म्हणायचं का? किरीट सोमैया यांचा सवाल

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असं आव्हानच भाजपा नेते किरीट सोमैया यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. तुम्ही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राणेंमध्ये सेटिंग झाली आहे का? असा सवाल किरीट सोमैया यांनी केला.

kirit somaiya
किरीट सोमय्या

By

Published : Nov 24, 2021, 7:04 AM IST

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बांधलेल्या बंगल्यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया (Kirit somaiya) का बोलत नाहीत, असा सवाल विचारणाऱ्या शिवसेना नेत्यांना भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज उत्तर दिलंय. नारायण राणेंनी सीआरझेडचं उल्लंघन करत बंगला बांधलाय मग तुम्ही कारवाई का करत नाही. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसोबत सेटिंग केलं, असं म्हणायचं का, असा प्रतिसवाल भाजपा नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना विचारला आहे. आघाडी सरकरामधील नेते तुम्हाला दिसतात मग नारायण राणेंचा सीआरझेडमधील अनधिकृत बंगला दिसत नाही का, या अनिल परबांच्या प्रश्नाला किरीट सोमैया यांनी आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.

किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद
राज्य सरकार कारवाई करत का नाही - सोमय्यामहाराष्ट्र कोस्टल झोन अँथोरिटी आहे, त्याचे मंत्री आदित्य ठाकरे आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत तर उद्धव ठाकरे. सीआरझेड इक्झिकुशन कुणाकडे आहे तर राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे बंगला सीआरझेडचे उल्लंघन करून बांधला असेल तर राज्य सरकार कारवाई करत का नाही, असा थेट सवाल किरीट सोमैया यांनी विचारला.

ABOUT THE AUTHOR

...view details