रत्नागिरी -शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे. शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. चार काय चाळीस नवीन मंत्री झाले तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. शिवसेनेचा मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकणारच, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीतील हातखंबा इथे तरुणांच्या लसीकरण कार्यक्रमात बोलत होते.
'जिल्हा नियोजन बैठक आणि राणेंचा दौरा हा केवळ योगायोग' -
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीची बैठक 24 ऑगस्ट रोजी आहे. त्याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, नारायण राणे यांचा दौरा आहे म्हणून रत्नागिरी जिल्हा नियोजनची बैठक लागली, असे अजिबात नाही. बैठक आणि राणेंचा दौरा हा केवळ योगायोग आहे.