रत्नागिरी- खेड तालुक्यातील सुसेरी गावातील नारिंगी नदी किनारी मानवी शरीराचे अवयव व रक्ताचा सडा आढळून आला आहे. बेपत्ता वृद्धाचा शोध घेत असलेल्या ग्रामस्थांना सोमवारी मानवी शरीराचे अवयव व रक्ताचा सडा आढळून आला. त्यामुळे भयभीत झालेल्या शोधकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी तपास करीत होते. दरम्यान बेपत्ता वृध्दाच्या कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
नारिंगी नदीकिनारी मानवी शरीराचे अवयव व रक्ताचा सडा, घातपाताचा संशय - Maharashtra crime
रत्नागिरी- खेड तालुक्यातील सुसेरी गावातील नारिंगी नदी किनारी मानवी शरीराचे अवयव व रक्ताचा सडा आढळून आला आहे. बेपत्ता वृद्धाचा शोध घेत असलेल्या ग्रामस्थांना सोमवारी मानवी शरीराचे अवयव व रक्ताचा सडा आढळून आला. त्यामुळे भयभीत झालेल्या शोधकर्त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी तपास करीत होते. दरम्यान बेपत्ता वृध्दाच्या कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
खेड तालुक्यातील सुसेरी क्रमांक २ येथील मूळ रहिवासी बाळकृष्ण भागोजी करबटे (६५) हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असतात. दिनांक २४ रोजी आपल्या नातेवाईकांच्या कार्यासाठी मुंबई येथून सुसेरी येथे आले होते. रात्री कुटुंबियांसोबत जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घराजवळच्या ओढ्यात कचरा टाकून येतो असे सांगून घराबाहेर पडले होते ते परत घरी आले नाहीत. बाळकृष्ण यांचा मुलगा राकेश याने रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत. सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांना सोबत घेऊन पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी गावापासून जवळच असलेल्या स्मशानभूमीपासून काही अंतरावर नारिंगी नदी किनारी लाकडाच्या बांधलेल्या मचाणीमध्ये व परिसरात रक्ताचा सडा व काही मानवी अवयव दिसून आले.
पोलीस पाटील कैलास राईन यांनी खेड पोलीस स्थानकात या घटनेबाबत कळवले. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्यासह ताबडतोब पथकाला घेऊन धाव घेतली. सायंकाळी उशिरा पर्यंत घटनास्थळी काही कपडे, सूरी व नदीपात्रात तरंगणारी विजेरी आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. गावातून बेपत्ता झालेले बाळकृष्ण करबटे यांचा शोध पोलीस घेत असून ठसे तज्ञ व श्वान पथकाला घटनास्थळी बोलाविण्यात आले होते. नारिंगी नदी किनारी आढळलेल्या रक्त व अवयव नक्की कोणाचे हे हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान बेपत्ता बाळकृष्ण यांचा घातपात झाल्याचा संशय मुलगा राकेश याने व्यक्त केला आहे.