महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियमांचे उल्लंघन; निवळीतील हॉटेल वृंदावनला जिल्हा प्रशासनाने ठोकले टाळे - कोरोना नियमांचे उल्लघंन केल्याने हॉटेवर कारवाई

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टांरंट यांना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करुन फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे. तरीही नियम डावलून हॉटेल सुरू ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

हॉटेल वृंदावनला जिल्हा प्रशासनाने ठोकले टाळे
हॉटेल वृंदावनला जिल्हा प्रशासनाने ठोकले टाळे

By

Published : May 27, 2021, 7:22 AM IST

रत्नागिरी - प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही हॉटेल सुरू ठेऊन, प्रवाशांना टेबल सर्व्हिस दिल्याप्रकरणी निवळी (ता. रत्नागिरी) येथील हॉटेल वृंदावनवर तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडून कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्यात आले.

हॉटेल वृंदावनला जिल्हा प्रशासनाने ठोकले सील
कोरोना नियमांचे उल्लंघनकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टांरंट यांना सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत कोरोना नियमावलींचे पालन करुन फक्त घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार हॉटेलमध्ये बसून जेवण्यास मनाई आहे. तसेच हॉटेलच्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही. त्याचप्रमाणे सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी किंवा लसीकरण केलेले असणे बंधनकारक आहे. याअनुषंगाने मंगळारी (२५ मे) रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अचानक रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील हॉटेल वृंदावनला भेट दिली. त्यावेळी हे हॉटेल सुरू असल्याचे व एका आराम बसमधील प्रवासी हे टेबल सर्व्हीस घेताना आढळले. त्याचप्रमाणे याठिकाणी गर्दीही दिसली.
हॉटेल वृंदावनला जिल्हा प्रशासनाने ठोकले सील
याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रत्नागिरीचे तहसीलदार, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्न व औषध प्रशासन या विभागांमार्फत या हॉटेलवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये हॉटेलमध्ये टेबल सर्व्हीस देणे, सेवा पुरवठादार यांची कोरोना चाचणी केलेली नसणे, कोरोना नियमावलींचे उल्लघंन केल्याने तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तत्काळ हॉटेल वृंदावन हे पुढील आदेशापर्यंत सीलबंद केले. तसेच कोरोना नियमावलींचा भंग केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल आस्थापनावर १३ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details