कोकणात पेटले पौर्णिमेचे होम; होळी सण उत्साहात
कोकणात होळी उत्सवाला फार महत्व आहे. त्यामुळे कोकणात तेरसे शिमगे म्हणजे त्रयोदशीला होळी उभी रहाते. तर दुसरा पौर्णिमेचा शिमगा, म्हणजे पौर्णिमेच्या रात्री होळी उभी करण्याचा अनोखा सोहळा रंगतो.
कोकणातील होळी
रत्नागिरी - देशासह राज्यात होलिकोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. कोकणात होळीच्या उत्सवाचे २ प्रकार पाहायला मिळतात. त्रयोदशीच्या होळीनंतर पौर्णिमेचे होम पेटवण्यात आले. गुहागर तालुक्यातील कोंड कारूळ गावात देखील सुर्योदयापूर्वी होळी पेटवण्याची परंपरा आहे.
कोकणात होळी उत्सवाला फार महत्व आहे. त्यामुळे कोकणात तेरसे शिमगे म्हणजे त्रयोदशीला होळी उभी रहाते. तर दुसरा पौर्णिमेचा शिमगा, म्हणजे पौर्णिमेच्या रात्री होळी उभी करण्याचा अनोखा सोहळा रंगतो. होम पेटवल्यानंतर फाका(अर्थात एकामेकांच्या नावाने बोंबाबोंब करणे) घातल्या जातात.
बुधवारी जिल्ह्यातील विविध गावात पौर्णिमेचे होम पेटवण्यात आले. विशेष म्हणजे हे होम पेटवल्यानंतर फाका घालण्याची अनोखी परंपरा आजही जपण्यात आली आहे.