रत्नागिरी - अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत यापूर्वी जी भूमिका मी मांडली आहे, तीच भूमिका प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात मांडली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
'तीच' भूमिका प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात मांडली - उदय सामंत - अंतिम वर्ष परीक्षा महाराष्ट्र
जी भूमिका मी यापूर्वी मांडली आहे, तीच भूमिका मी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे, हे या कालावधीत महाराष्ट्र शासनाला शक्य नाही, अशा पद्धतीचेच प्रतिज्ञापत्र दिले आहे.
याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतचा विषय सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या बाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण, जी भूमिका मी यापूर्वी मांडली आहे, तीच भूमिका मी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे, हे या कालावधीत महाराष्ट्र शासनाला शक्य नाही, अशा पद्धतीचेच प्रतिज्ञापत्र दिले आहे. पण आम्ही परीक्षाच घेणार नाही, अशा पद्धतीचा अपप्रचार विरोधक करत आहेत. पण आम्ही कुठेही म्हटले नाही, की आम्ही परीक्षाच घेणार नाही, कोविड गेल्यानंतर ज्यांना गुणांमध्ये सुधारणा करायची आहे, ज्यांना ग्रेडमध्ये सुधारणा करायची आहे, ते परीक्षा देऊ शकतात आणि त्यांच्यासाठी विद्यापीठे परीक्षा घेतील, असे आम्ही यापूर्वीच जाहीर केले आहे. पण, सध्या हा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने आज या विभागाचा प्रमुख म्हणून याबाबत काही वक्तव्ये मी करणे योग्य ठरणार नाही, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये निर्माण केली रोजगाराची नवी संधी; सात गुंठे जागेत फुलवला भाजीचा मळा