रत्नागिरी - भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवरून शिवसेनेने भाजपला चिमटे काढले आहेत. एकनाथ खडसेंनी कुठल्या पक्षात जावं, हा त्यांचा प्रश्न आहे, पण ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी जिवाचं रान केलं, त्या व्यक्तीवर अशी पक्ष सोडण्याची वेळ येणं दुदैवी असल्याचं मत शिवसेना प्रवक्ते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
..त्या व्यक्तीवर अशी पक्ष सोडण्याची वेळ येणं दुर्दैवी - उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
एकनाथ खडसेंनी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी जीवाचं रान केलं, त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ येणं दुर्देवी असल्याचं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावे,अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
यावेळी सामंत म्हणाले की, खडसे एक मोठे नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावे, हे यापूर्वीही मी विधान केलं होतं. आजही माझी तीच इच्छा असल्याचं शिवसेना प्रवक्ते उदय सामंत म्हणाले.
Last Updated : Oct 7, 2020, 8:25 PM IST