रत्नागिरी -सागरी मार्गांने अतिरेकी घातपातासाठी घुसण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सध्या हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सागरी किनारपट्टीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा, कोस्टगार्ड आणि कस्टम विभाग या तिन्ही यंत्रणा आपापल्या परीने बोटींची कसून चौकशी करत आहेत.
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट, बंदरात येणाऱ्या नौकांची कडक तपासणी - mumbai
सागरी मार्गांने अतिरेकी घातपातासाठी घुसण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सध्या हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये सापडलेला बॉम्ब, त्यामुळे सागरी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्यात आता गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट वर्तवला आहे. त्यामुळे सागरी किनारपट्टीवरची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभल आहे. अतिरेकी समुद्रमार्गाने येण्याची शक्यता असल्याने सध्या खोल समुद्रात आणि किनाऱ्यावर यंत्रणा गस्त घालताना पहायला मिळत आहे.
कस्टम विभागाच्या माध्यमातून खोल समुद्रातील बोटींवरील खलाशी आणि बंदरात मच्छिमारी करून आलेल्या बोटींची कसून चौकशी करण्यात येत आहे. बोट नेमकी कुठून आली आहे ? खलाशी कुठले आहेत ? पाकिस्तानी, नेपाळी की स्थानिक याबाबत त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करण्यात येत आहे.