महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 20, 2020, 12:37 PM IST

ETV Bharat / state

'तिवरे' गावावर निसर्गाची पुन्हा वक्रदृष्टी, वादळी वाऱ्यासह गारपीटीने झोडपले

अचानक आलेल्या वादळाने अनेक घरांवरील पत्रे उडाले. ठिकठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे.

Gar
वादळी वाऱ्यासह झालेली गारपीट

रत्नागिरी- गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या धरण फुटीनंतर रविवारी पुन्हा एकदा तिवरे गावावर निसर्ग कोपलेला असल्याचे दिसून आले आहे. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीटीने तिवरे गावाला झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले. विजेचे खांब, झाडे कोसळल्याने गावात पुन्हा एकदा संकट कोसळले आहे.

गेल्यावर्षी तिवरे गावात अतिवृष्टीमुळे धरण फुटून मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. त्यातून गाव सावरत असतानाच रविवारी सायंकाळी वादळी पावसाने पुन्हा एकदा गावात हाहाकार माजवला. अचानक आलेल्या वादळाने अनेक घरांवरील पत्रे उडाले. काहींचे छप्परच उडून गेले आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे. झाडेही ठिकठिकाणी कोसळून मार्ग बंद झाले आहेत.

तालुक्याच्या एका टोकाला आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने चिपळुणात लगेच याची माहिती पोहोचली नाही. शिवसेनेचे मंगेश शिंदे तसेच ग्रामस्थ अजित चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र सायंकाळ झाल्याने आणि अंतरही दूरचे असल्याने आज नुकसानीचे पंचनाम्यांचे काम हाती घेतले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details