मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने भाविक कोकणात दाखल होत असतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे मुंबईवरून निघालेल्या भाविकांना १८ ते २२ तास आपल्या गावी पोहोचण्यास लागत आहे. त्यातच आज दिवसभर जगबुडी पुलावर अनेक वेळा वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे पुलावर वाहनांची लांब रांग पाहायला मिळाली.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहन चालकांची कसरत
पावसाची रिमझिम सुरुच आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच आज दिवसभर जगबुडी पुलावर अनेक वेळा वाहतुकीची कोंडी झाली आहे.
पावसाची रिमझिम सुरुच आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. आज दिवसभरात जगबुडी पुलावर अनेक वेळा वाहतुकीची कोंडी झाली. तर पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे कशेडी आणि भोस्ते घाटातून धिम्या गतीने वाहतूक सुरु आहे.
सध्या या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. महामार्गावर वाहने चालवताना सावकाश चालवावीत. कशेडी घाटात रायगड हद्दीत निसरड्या रस्त्यामुळे दोन अपघात झाले आहेत. पण सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. कुणीही ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन, कशेडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश उसगावकर यांनी केले आहे.