रत्नागिरी -कालपासून जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसत आहे. दापोली, लांजा, राजापूर वगळता इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली. संगमेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून संगमेश्वरमध्ये 142.30 मिलिमीटर पाऊस पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 92.71 मिमी तर आत्तापर्यंत एकूण 834.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस; संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद - रत्नागिरी मुसळधार पाऊस न्यूज
दापोली, लांजा, राजापूर तालुके वगळता रत्नागिरी जिल्ह्यात इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली. संगमेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून संगमेश्वरमध्ये 142.30 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
गेल्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र होते. अधूनमधून श्रावणसरी बरसत होत्या. मात्र, सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. गेल्या 24 तासात 92.71 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 102.30 मिमी, दापोली 70.80, खेड 98.60 मिमी, गुहागर 110.60, चिपळूण 83.60 मिमी, संगमेश्वर 142.30 मिमी, रत्नागिरी 33.30 मिमी, राजापूर 60.30 मिमी, लांजा 65.80 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून काजळी नदीची पाणी पातळी वाढली आहे.
दरम्यान, कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 4, 5 व 6 ऑगस्टला मुंबई, पालघर, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.