महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा - रत्नागिरी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

Ratnagiri rainfall
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी

By

Published : Jun 1, 2020, 4:04 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात उष्णतेमुळे वाढलेल्या उकाड्याने नागरिकही हैराण झाले होते. अखेर दुपारनंतर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. काही ठिकाणी लहान मुलानी या पावसांत भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तर हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सध्या काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाही सुखावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details