महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत पावसाची संततधार कायम, चिपळूणमध्ये सर्वाधिक 165 मिलिमीटर पावसाची नोंद - रत्नागिरी बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर सर्वात कमी पाऊस लांजा तालुक्यात पडला.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By

Published : Sep 6, 2019, 11:19 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. अशात आता पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. पण अधूनमधून सरींवर सरी बरसत आहेत.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 87.11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी मंडणगड, दापोली आणि चिपळूण तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यामध्ये सर्वाधिक 165 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, मंडणगडमध्ये 130 आणि दापोलीत 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वरमध्ये 95 मिलिमीटर, राजापूरमध्ये 85 आणि खेड तालुक्यात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत 51 आणि लांजा तालुक्यात 45 मिलिमीटर पाऊस पडला.

ABOUT THE AUTHOR

...view details