रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत म्हणजेच खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर आदी भागात मुसळधार पाऊस आहे. आज सकाळपासून संगमेश्वर तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास माखजन, संगमेश्वर, फुणगुसला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
उत्तर रत्नागिरीसह संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर रत्नागिरीत म्हणजेच खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर आदी भागात मुसळधार पाऊस आहे. आज सकाळपासून संगमेश्वर तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास माखजन, संगमेश्वर, फुणगुसला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
उत्तर रत्नागिरीसह संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस
गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात एकूण 514 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 57.11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात 117 मिलिमीटर पावसासह गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल खेडमध्ये 87 तर दापोली तालुक्यात 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुहागर आणि चिपळूणमध्येही 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपात्रातही वाढ झालेली आहे.