रत्नागिरी- गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाने विशेषतः उत्तर रत्नागिरीला रात्रीपासूनच झोडपून काढले आहे. त्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून लोकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
उत्तर रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले; चिपळूणमध्ये ठिकठिकाणी तुंबले पाणी - Sangameshwar
संगमेश्वर, चिपळूण, खेडमध्ये रात्री सुरू झालेला पाऊस आजही संततधार सुरू आहे. त्यातच चिपळूण शहरातील पॉवर हाऊस परिसरात नालेसफाई न झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे.
![उत्तर रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले; चिपळूणमध्ये ठिकठिकाणी तुंबले पाणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3841093-thumbnail-3x2-kl.jpg)
गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. पाणी पातळीत वाढ झाल्याने जगबुडी आणि वाशिष्ठी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आठवड्याची सुरुवात मुसळधार पावसाने झाली आहे.
संगमेश्वर, चिपळूण, खेडमध्ये रात्री सुरू झालेला पाऊस आजही संततधार सुरू आहे. त्यातच चिपळूण शहरातील पॉवर हाऊस परिसरात नालेसफाई न झाल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे, याचा आढावा आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी घेतला आहे.