महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरज असेल तरच लोकांनी बाहेर पडावे; आमदार सदानंद चव्हाण यांचे आवाहन - rakesh gudekar

वाशिष्ठी नदीला पूर आल्याने चिपळूण शहराला पुराचा वेढा कायम आहे. बसस्थानक, चिंचनाका, चिपळूण बाजारपेठत पुराचे पाणी घुसले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सदानंद चव्हाण यांनी लोकांना सर्तक राहण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी

By

Published : Jul 15, 2019, 3:30 PM IST

Updated : Jul 15, 2019, 4:23 PM IST

रत्नागिरी - वाशिष्ठी नदीला पूर आल्याने चिपळूण शहराला पुराचा वेढा कायम आहे. बसस्थानक, चिंचनाका, चिपळूण बाजारपेठत पुराचे पाणी घुसले आहे. सकाळपासून पावसाने चिपळूणला झोडपून काढले आहे. त्यामुळे चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आ. चव्हाण यांच्याशी संवाद साधताना आमचे प्रतिनिधी

कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्याने आणि भरतीमुळे वाशिष्ठीच्या पुराच्या पाण्याला फुगवटा वाढला आहे. सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान, या परिस्थितीची पाहणी प्रशासन तसेच आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले आहे. या पूर परिस्थितीबाबत आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

Last Updated : Jul 15, 2019, 4:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details