रत्नागिरी -जिल्ह्यात दुपारपासून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून लांजा, राजापूर, रत्नागिरी, देवरूख आणि संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तर आज सकाळपासून दापोली, मंडणगड, चिपळूणमध्येही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी - रत्नागिरी मुसळधार पाऊस न्यूज
जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी मान्सूनने हजेरी लावली आहे. मात्र, पावसाचा अपेक्षित जोर बघायला मिळत नव्हता. आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची जोर वाढलेला दिसला. पावसाचा जोर वाढत असल्याने अनेक ठिकाणी नदी, ओहळांच्या पाणीपातळीत देखील वाढ होताना दिसत आहे.
जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी मान्सूनने हजेरी लावली आहे. मात्र, पावसाचा अपेक्षित जोर बघायाला मिळत नव्हता. आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची जोर वाढलेला दिसला. पावसाचा जोर वाढत असल्याने अनेक ठिकाणी नदी, ओहळांच्या पाणीपातळीत देखील वाढ होताना दिसत आहे. समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकऱयांची संध्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 18 तारखेपर्यंत सर्वदूर 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडेल. याच काळात काही ठिकाणी 64.5 मिलिमीटर ते 115.5 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.