रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. विशेषतः दक्षिण रत्नागिरीला गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दक्षिण रत्नागिरीतील चारही तालुक्यांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर रत्नागिरीतील दापोली तालुक्यात 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. इतरही तालुक्यात 70 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार; सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात - ratnagiri heavy rain
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस पडत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सरासरी 112 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात पडला असून, राजापूरमध्ये तब्बल 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस पडत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सरासरी 112 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात पडला असून, राजापूरमध्ये तब्बल 190 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राजापूरप्रमाणेच दक्षिण रत्नागिरीतील संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरीमध्येही 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
लांजा तालुक्यात 146, रत्नागिरी तालुक्यात 139 तर संगमेश्वर तालुक्यात 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर रत्नागिरीतील दापोली तालुक्यात 130 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागरमध्ये 88, चिपळूण 75 मिमी, खेडमध्ये 70 मिमी तर मंडणगडमध्ये 74 मिमी पावसाची नोंद झाली आहे.