रत्नागिरी -रत्नागिरी जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्यांनी आपले रौद्ररुप धारण केले आहे. इथल्या बहुतांश नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. नदीकाठी असणारी भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आणखी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील काजळी नदीने देखील रौद्ररुप धारण केले आहे आणि आपले पात्र सोडले आहे. त्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे.
सखल भाग जलमय
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पावसमध्ये देखील सखल भागात पाणी शिरले होते. इथल्या गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी, समाधी मार्गावरील सखल भागात पाणी शिरले. मुसळधार पावसाने गौतमी नदी ओसंडून वाहत आहे.