महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ - रत्नागिरी लेटेस्ट न्यूज

माखजन बाजारपेठेतही पुन्हा एकदा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर ओसरला असला, तरी पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील कोदवली, वाशिष्ठी, जगबुडी, काजळी या नद्या दुथडीभरून वाहत आहेत.

रत्नागिरीत पाऊस
रत्नागिरीत पाऊस

By

Published : Jul 13, 2021, 3:23 PM IST

Updated : Jul 13, 2021, 3:37 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दरम्यान रात्री पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नद्यांच्या पुराचे पाणी शिरले. माखजन बाजारपेठेतही पुन्हा एकदा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर ओसरला असला, तरी पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील कोदवली, वाशिष्ठी, जगबुडी, काजळी या नद्या दुथडीभरून वाहत आहेत. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याचे पाहायला मिळाले.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
जिल्ह्यात सरासरी 130.26 मि.मी. पावसाची नोंद

दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 130.26 मि.मी. तर एकूण 1172.30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये तब्बल 215.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली 94.30 मि.मी., खेड 46.50, गुहागर 135.60 मि.मी., चिपळूण 102.50 मि.मी., संगमेश्वर 145.00 मि.मी., रत्नागिरी 162.90 मि.मी., राजापूर 128.70 मि.मी., लांजा 141.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Last Updated : Jul 13, 2021, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details