महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सलग सहाव्या दिवशी रत्नागिरीत मुसळधार; गणेशभक्तांच्या उत्साहावर फेरलं पाणी - rain news ratnagiri

गेल्या 24 तासात उत्तर रत्नागिरीत 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 125 मिमी, दापोलीत 121 तर खेडमध्ये 116 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  तर राजापूरमध्ये 96 मिमी, चिपळूणमध्ये 80 आणि संगमेश्वरमध्ये 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी मुसळधार पाऊस

By

Published : Sep 7, 2019, 7:45 PM IST

Updated : Sep 7, 2019, 8:17 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. बाप्पाच्या आगमनापासून सुरु झालेला पाऊस अजूनही कायम आहे. ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यात गणपतीसाठी दाखल झालेल्या चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. ट्रेन, बस यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे गावा-गावात गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या आणि गावकऱ्यांच्या उत्साहावर पावसाने मात्र पाणी फेरलं आहे.

रत्नागिरी मुसळधार पाऊस

हेही वाचा-सलग दुसऱ्या दिवशी राजापूर शहराला पुराचा वेढा; जनजीवन विस्कळीत


आज सकाळपासूनच जिल्ह्यात अक्षरशः धो-धो पाऊस कोसळत आहे. पाऊस असाच पुढील दोन दिवस राहिला तर परतीच्या प्रवासाला लागणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न येऊ शकते.

दरम्यान, गेल्या 24 तासात उत्तर रत्नागिरीत 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंडणगडमध्ये 125 मिमी, दापोलीत 121 तर खेडमध्ये 116 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर राजापूरमध्ये 96 मिमी, चिपळूणमध्ये 80 आणि संगमेश्वरमध्ये 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागर, रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमध्येही 40 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

Last Updated : Sep 7, 2019, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details