रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेले दोन दिवस सलग दिवसभर आणि रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पावसामुळे बुधवारी संध्याकाळी चिपळूणमध्ये तसेच राजापूरमध्ये सखल भागात पाणी साचले होते. आजही काहीशी अशीच स्थिती होती.
रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; चिपळूण, दापोलीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १२४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पण चिपळूण आणि दापोलीमध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १२४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पण चिपळूण आणि दापोलीमध्ये अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात दापोलीत १८० मि.मी तर चिपळूणमध्ये १६५ मि.मी पाऊस पडला आहे. त्याखालोखाल खेडमध्ये १४२ मि.मी, लांजा तालुक्यांमध्ये १३० मि.मी, संगमेश्वरमध्ये १२४ मि.मी तर मंडणगडमध्ये १२० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर राजापूरमध्ये ९९ मि.मी, गुहागरमध्ये ९० आणि रत्नागिरीमध्ये ६५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.